भाजपा नेते किरीट सोमय्यांचे मुख्यमंत्र्यांना दिले ‘हे’ खुले आव्हान

 

राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून अनेक मंत्र्यांवर आणि नेत्यांवर विरोध पक्षाकडून गंभीर स्वरूपाचे आरोप लावण्यात आले होते. त्यातच अनिल देशमुखांपाठोपाठ परिवहन मंत्री अनिल परब यांच्या सुद्धा अडचणी ईडीने वाढवल्या होत्या. त्यात आघाडी सरकारच्या मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्या विरोधात थेट शड्डू ठोकला आहे.

अनिल परब यांचे दापोलीतील दोन रिसॉर्ट अनिधिकृत असून त्यांपैकी एका रिसॉर्टवर आणि स्वत: अनिल परब यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, परब हे मंत्री असल्याने त्यावर कारवाई होत नाही, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. असे असले तरी परब यांची आज ना उद्या मंत्रिमंडळातून हकालपट्टी होणारच, पण त्यांच्यावर फौजदारी आणि दिवाणी गुन्हेही कसे दाखल होतील हे भारतीय जनता पार्टी पाहील आहे, असा इशारा सोमय्या यांनी दिला आहे.

किरीट सोमय्या हे सिधुदुर्ग येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर हल्लाबोल करताना सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. अनिल परब यांच्या अनिधिकृत रिसॉर्टवर कारवाई ही होणारच, हिम्मत असेल तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ते वाचवून दाखवावे, असे आव्हानही सोमय्या यांनी दिले आहे.

Team Global News Marathi: