युवासेनेचे कोषाध्यक्ष अमेय घोले यांचा या दोन नेत्यांवर आरोप करत शिंदे गटात प्रवेश

 

राज्यात शिंदे फडणवीस यांचं सरकार स्थापन झाल्यापासून अनेकांनी उद्धव ठाकरे गटाची साथ सोडून थेट शिंदे गटात प्रवेश केला होता अशातच आता आदित्य ठाकरे यांचे विश्वासही, वडाळा विभागाचे माजी नगरसेवक आणि युवासेना कोषाध्यक्ष अमेय घोले यांनी काळ आपल्या युवासेना कोषाध्यक्ष पदाचा राजीनामा देत रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला आहे.

अमेय घोलेंनी आदित्य ठाकरेंना लिहिलेल्या पत्रात नेमकं काय म्हटलंय?

“मी राजकारणात आलो तुमच्यामुळे, तुम्ही माझ्यावर विश्वास दाखवलात आणि मला युवा सेनेच्या माध्यमातून संधी दिली. तुम्ही दिलेली प्रत्येक जबाबदारी मी गेले १३ वर्ष अत्यंत प्रामाणिकपणाने पार पाडली. परंतू वडाळा विधानसभा मतदारसंघात काम करत असताना महिला संघटक श्रद्धा जाधव आणि शिवसेना सचिव सूरज चव्हाण यांनी माझ्या कामात वारंवार अडथळे आणायचा प्रयत्न केला त्यामुळे मला काम करताना खूप त्रास व मनस्ताप झाला. याबाबत मी आपल्याला वेळोवेळी माहिती दिली होती.

संघटनेतील काही मतभेद दूर व्हावे व मला सुरळीतपणे माझे कार्य सुरू ठेवता यावे म्हणून मी खूप प्रयत्न केला. परंतु काही कारणास्तव यावर काहीच मार्ग काढला गेला नाही. त्यामुळे आज अखेरीस जड अंतःकरणाने मला युवासेना सोडण्याचा निर्णय घ्यावा लागतो आहे. सांगण्यास अत्यंत दुःख होत आहे की आज मी माझ्या युवासेनेच्या कोषाध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे. आदित्यजी आपली मैत्री ही केवळ राजकारणापुरती नाही. तुमच्या बरोबरचा संघटनेतील माझा प्रवास थांबवत असलो तरी आपली मैत्री कायम राहावी हीच अपेक्षा व्यक्त करतो”

आपला अमेय घोले

Team Global News Marathi: