अजित पवारांचे पुण्यातील नियोजित दौरे रद्द, भाजपत जाण्याच्या चर्चांना वेग ?

 

राज्याच्या राजकारणात सध्या अजितदादा पवार केंद्रबिंदू असून ते भारतीय जनता पक्षासोबत जाणार असल्याची वारंवार चर्चा होत आहे आणि अजित पवार त्यावर वारंवार खुलासा देखील करत आहेत. सोमवारीही त्यांनी पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द केल्याची चर्चा होती. तसंच आज आमदारांची बैठक बोलावल्याचीही जोरदार चर्चा होत आहे. त्यातच राष्ट्रवादीचे अनेक आमदार मुंबईकडे निघाल्याची माहिती आहे.

मुंबईकडे निघालेले सर्व आमदार आपल्या खाजगी कामासाठी निघाल्याचं सांगतायत. तर दुसऱ्या बाजूला भाजप आणि शिवसेना नेते त्यांच्या भाजप प्रवेशावर वक्तव्य करून अजित पवारांच्या चर्चेला खतपाणी घालत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर अजित पवारांनी मोठं स्पष्टीकरण दिले आहे आज मी आमदारांची कोणताही बैठक बोलावली नाही. एवढंच नाही तर सोमवारी कोणताही नियोजित कार्यक्रम नव्हता, असंही अजित पवारांनी स्पष्ट केलंय. काहीही असो आपल्याच नावाची चर्चा वारंवार का होतेय? यांचं उत्तर अजित पवार कधी देणार, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

 

अजित पवार म्हणतात, माझे कुठलेही नियोजित कार्यक्रम नव्हते असं असतानाच पुरंदर हवेलीत राष्ट्रवादी काँग्रेसनं आयोजित केलेल्या युवक आणि शेतकरी मेळाव्याचं आमंत्रण पत्रिका समोर आली आहे. त्यामध्ये मार्गदर्शन म्हणून अजित पवार तर प्रमुख पाहुण्या खासदार सुप्रिया सुळे होत्या. पण, अजित पवारांनी कार्यक्रम रद्द केले, आणि त्यांच्या जागी कार्यक्रमात खुद्द शरद पवार उपस्थित झाले. त्यामुळेच अजित पवारांनी नकार दिला म्हणून शरद पवारांनी कार्यक्रमासाठी होकार दिला का? असा सवाल उपस्थित होत आहे.

Team Global News Marathi: