तुमच्या ‘तिसरी लाट’ या चित्रपटामध्ये मला मृतदेह मोजण्यासाठी स्पाॅट बाॅयचं काम द्या – राम गोपाळ वर्मा

सध्या संपूर्ण देशभरात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. त्यात मृत्यूचे प्रमाणही वाढलेले दिसून येत आहे. अशातच बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसिवीर यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. या कारणांमुळे देशात मोठ्या प्रमाणात लोकांचा मृत्यु होत आहे. मात्र आज १ वर्ष उलटला तरी देखील कोरोनाचे संसर्ग थांबत नसल्याने अनेकांनी सरकारवर संताप व्यक्त केला आहे. अशाप्रकारे प्रसिद्ध निर्माते राम गोपाल वर्मा यांनी देखील पंतप्रधान मोदींवर संतापजनक एक ट्विट केलं आहे.

राम गोपाळ वर्मा हे परखड मत मांडण्यासाठी ओळखले जातात. त्यांनी अनेकवेळा केंद्राच्या भूमिकेवर ताशोरे ओढले आहे. त्यांच्या चित्रपटांसारखं त्यांच्या विचारांना देखील लोक तेवढाच प्रतिसाद देतात. अशातच राम गोपाल यांनी नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना टॅग करुन एक ट्विट केलं आहे. या ट्विटमधून राम गोपाल वर्मा यांनी दोघांवरही जोरदार टिका केली आहे. यादरम्यान त्यांनी मोदींवर टिकास्त्र सोडत आपण हाॅरर चित्रपटांची निर्मिती करणारा साधा निर्माता आहे, मात्र मला तुमच्या नवीन चित्रपट ‘तिसरी लाट’ मध्ये स्पाॅटबाॅयचं काम द्या, असं म्हटलं आहे.

राम गोपाल यांनी ट्विटमध्ये म्हटल्याप्रमाणे ‘तिसरी लाट’ या चित्रपटामध्ये राम गोपाल वर्मा यांना मृतदेह मोजण्याच्या डिपार्टमेंटला क्लर्कचं काम द्यावं, अशी विनंती केली आहे. एवढंच नाही तर नरेंद्र मोदींना जेवढे मृतदेह आवडतात तसेच राम गोपाल वर्मा यांना देखील आवडत असल्याचं या ट्विटमध्ये म्हटलं आहे. यावेळी त्यांनी सोनिया गांधी यांच्यावर निशाणा साधत २०१४ मध्ये मोदींना ‘मौत का सौदागार’ असं सोनिया गांधी म्हणाल्या होत्या, त्यांच्या इतकी दुरदृष्टी होती हे आपल्याला कधीच कळालं नसून डिजीटलद्वारे आपले पाय पाठवावे जे धरुन क्षमा मागता येईल असे ट्विट त्यांनी केले आहे.

Team Global News Marathi: