तुमची घाणेरडी प्रकरणे बाहेर येत आहेत म्हणून राज्यातील कोरोना वाढत आहे का? – संदीप देशपांडे

राज्यात कोरोनाने पुन्हा आपलं डोकं वर काढलं आहे. आज वाढत असलेली रुग्णसंख्या राज्य सरकारच्या अडचणी वाढवताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा कडक निर्बंध लादण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. या निर्णयावर आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ठाकरे सरकारला टोला लगावला आहे.

महाराष्ट्राला लागून असलेल्या गोवा, कर्नाटक आणि गुजरात या राज्यात कोरोना नाही, फक्त महाराष्ट्र राज्यातच कोरोना कसा वाढत आहे ? असा प्रश्न मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी विचाराला आहे. कोरोनाचा राज्य सरकारकडून बाऊ केला जात आहे, लोकांना कोरोनाच्या नावाखाली भीती दाखवली जाते असल्याचा आरोप मनसेकडून सातत्याने केला जात आहे.

तुमची घाणेरडी प्रकरणे बाहेर येत आहेत म्हणून राज्यातील कोरोना वाढत आहे का? महाराष्ट्राला लागून असलेल्या राज्यात कोरोना नाही, मग महाराष्ट्रातच तो कसा वाढत आहे? सरकारचे कोरोनावर का कोरोनाचे सरकारवर प्रेम आहे ? असा सवाल देशपांडे यांनी विचारला आहे.

कोरोना रुग्ण संख्या कमी होते तेंव्हा आदित्य ठाकरे यांचा ‘वरळी पॅटर्न’ आणि कोरोना रुग्ण वाढले की लोक बेजबाबदार अशी बोचरी टीका मनसेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्य सरकारवर केली आहे. जनतेने काम करायचे नाही का ? सरकारने कोरोनाच्या नावावर लोकांना फक्त घाबरवायचे का? असाही सवाल मनसेकडून केला गेला आहे.

Team Global News Marathi: