जळगावात शिवसेनेने दिला भाजपाला जोरदार धक्का

जळगावात शिवसेनेनं भारतीय जनता पक्षाच्या गडाला सुरुंगाचं लावला आहे. सध्या भारतीय जनता पक्षाचे २५ नगरसेवक ठाण्यात दाखल झाले आहे. आता त्या पाठोपाठ आणखी पाच नगरसेवक शिवसेनेत सामील झाले आहे. ठाण्यात एकत्र आलेल्या नगरसेवकांची संख्या २५ वरून ३० वर पोहोचली आहे. भाजपाचे ५७ पैकी ३० नगरसेवक शिवसेनेत दाखल झाले आहेत. हा एक प्रकारे माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

जळगाव महापालिकेची महापौर आणि उपमहापौर निवडणूक येत्या गुरुवारी (१८ मार्च) रोजी होणार आहे. मात्र, त्यापूर्वीच सत्ताधारी भाजपला शिवसेनेनं २७ नगरसेवक फोडले आहेत. जळगाव महापालिकेची जबाबदारी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू सहकारी आणि माजी गिरीष महाजन यांच्यावर आहे.

पण आता महापौर आणि उपमहापौर निवडणुकीपूर्वीच सत्ताधारी भाजपाचे अनेक नगरसेवक शिवसेनेत दाखल झाल्यामुळे एक प्रकारे शिवसेनेनं राजकीय सर्जिकल स्ट्राईक करत भाजपचा गड उद्धवस्त केला आहे. जळगाव महापालिकेचे शिवसेनेनं फोडलेले सर्व २७ नगरसेवक शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात असल्याची माहिती खात्रीदायक सूत्रांनी दिली आहे.

Team Global News Marathi: