तुम्ही संधीचा योग्य फायदा उठवला, रोहित पवारांकडून अमृता फडणवीसांच्या गाण्याचे कौतुक

सतत वादग्रस्त वक्तव्य करत आणि गाण्याच्या माध्यमातून कायम चर्चेत राहणाऱ्या माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचे नवीन गाणे महिला दिनाच्या दिवशी प्रदर्शित करण्यात आले होते. यावर आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करून प्रतिक्रिया दिली आहे

रोहित पवार आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, काही लोकांना सहज तर काहींना प्रयत्न करूनही संधी मिळत नाही. ज्यांना सहज संधी मिळते ते या संधीचा योग्य वापर करतातच असं नाही, पण अमृता फडणवीस यांना मिळालेल्या संधीचा आपण गाण्याची आवड जोपासण्याचा जो प्रयत्न करता त्याचा आदर वाटतो. अशीच आवड जोपासा. आपल्याला मनापासून शुभेच्छा! असे ट्विट त्यांनी केले आहे.

मागच्या अनेक दिवसांपासून नेटकऱ्यांना उत्सुकता असलेले अमृता फडणवीस यांचे नवीन गाणे सोमवारी प्रदर्शित झाले. नाट्य संगीतावर आधारित ‘कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी.’ हे गाणे सध्या चाहत्यांचा पसंतीस उतरत आहे. तसेच अनेकांनी या गाण्याचे तोंडभरून कौतुक केले आहे.

Team Global News Marathi: