महाबळेश्वर येथे मुख्याध्यापकाने विद्यार्थिनीवर शाळेतच केला बलात्कार

राज्यात दिवसेंदिवस महिला अत्याचाऱ्याच्या घटना वाढताना दिसत आहे. आज एकीकडे महिला दिन साजरा करत असताना दुसरीकडे मात्र महिला अत्याचाऱ्यांच्या घटना वाढताना दिसत आहे अशातच आता साताऱ्यातील महाबळेश्वर येथे एक धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर येत आहे.

शाळेतील मुख्याध्यापकानेच शाळेतील एका विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. साताऱ्यातील महाबळेश्वर या ठिकाणी ही घटना घडली. याप्रकरणी नराधम शिक्षकाला अटक करण्यात आली असून या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महाबळेश्वरमधील माखरिया नावाची हायस्कूल आहे. या हायस्कूलमध्ये एका शाळेच्या मुख्याध्यापकाने एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. दिलीप ढेबे असे संशयित आरोपीचे नाव आहे. आरोपी दिलीप ढेबे हा या शाळेचा मुख्याध्यापक आहे. या मुख्याध्यापकाने शाळा बंद असल्याचा फायदा घेऊन शाळेत बलात्कार केल्याचे बोललं जात आहे.

Team Global News Marathi: