‘तू बोलतो किती? तुझी औकात किती? तू आहेस केवढा? मिटकरी यांचा नाव न घेता पडळकरांना टोला

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या टीकेला आमदार अमोल मिटकरी यांनी जोरदार प्रतिउत्तर दिले होते. आता पुन्हा एकदा मिटकरी यांनी नाव न घेता पडळकरांना टोला लगावला आहे. ते पत्रकार माध्यमांशी बोलत होते.

“तू बोलतो किती? तुझी औकात किती? तू आहेस केवढा? मला एक पत्रकार म्हणे बोला त्याच्यावर, मी म्हटलं, माझ्यासवे लढाया वाघास बोलवावे, कुत्र्यास फाडण्याचा माझा स्वभाव नाही. समोर कॅमेरा असल्याने मी नाव न घेता बोलणार आहे”, अशा शब्दात अमोल मिटकरी यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर नाव न घेता चांगलाच समाचार घेतला होता.

पुढे बोलताना मिटकरी म्हणाले की, “मी नागज फाट्यावर दारू विकली नाही किंवा कोणत्या आजीची दोन कोटींची जमीन बळकावली नाही. मी कुत्र्यांना भीत नाही”, “तुम्हाला काय वाटतं, हे सोपं असते. एखादं श्वान बैलाच्या मागे भूंकतं. बैल एकदा, दोनदा ऐकतो, तिसऱ्यांदा मात्र लाथ मारतो. बैलाने लाथ मारल्यानंतर कुत्रा मागेच जातो”, असा टोला त्यांनी नाव न घेता पडळकरांना लगावला होता.

Team Global News Marathi: