शेतकरी आंदोलनांचा भाजपाला फटका, स्थानिक संस्था निवडणुकीत पराभव

केंद्राने पारित केलेल्या नव्या कृषी कायद्याविरोधात शेतकरी मागच्या दोन महिन्यापासून आंदोलन करत आहे. त्यात प्रजासत्ताकदिनी लाल किल्ला परिसरात झालेल्या आंदोलनामुळे शेतकऱ्यांना संपूर्ण देशभरातून पाठिंबा मिळताना दिसत होता. मात्र या आंदोलनाचा फटका भाजपाला स्थानिक निवडणुकांमध्ये बसताना दिसत आहे.

काँग्रेसने पंजाबमधील आठपैकी सात महानगरपालिका आणि १०९ पैकी ६३ नगर परिषदांवर दणदणीत विजय मिळवत भाजपाचा पराभव केला आहे. शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंजाबी मतदारांनी भाजपला दिलेला हा जोरदार झटका असून भाजपसाठी धोक्याची घंटा मानण्यात येत आहे.

भटिंडा, बाटला, पठाणकोट, अबोहर, मोगा, होशियारपूर, कपूरथला या महानगरपालिका काँग्रेसने मोठ्या बहुमताने जिंकल्या आहेत. विशेष म्हणजे तब्बल ५३ वर्षांनी भटिंडा महानगरपालिका काँग्रेसच्या ताब्यात आली आहे. भटिंडात काँग्रेसने ५० पैकी ४३ जागा जिंकल्या आहेत. भाजपला येथे एकही जागा मिळाली नाही. एवढी वर्षे या महानगरपालिकेत शिरोमणी अकाली दलाची एकहाती सत्ता होती.

Team Global News Marathi: