राज्यातील अनेक ठिकाणी सोमवारी अचानक शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरले. मुंबईत विद्यार्थ्यांनी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या घरालाही घेराव घातला होता. त्यामुळे विध्यार्थ्यांच्या या आंदोलनामुळे मुंबईत परिस्थिती काही चिघळली दिसून आली होती यावेळी मोठी गर्दी पाहता विद्यार्थ्यांना पागवण्यासाठी पोलीसांना सौम्य लाठीमारही करावा लागला.
मात्र दुपारनंतर या घटनेसंदर्भात हिंदुस्थानी भाऊचे नाव समोर आले. हा हिंदूस्थानी भाऊ नेमका कोण, तो कोणत्या पक्षाशी संबंधित आहे, त्याचा नेमका उद्देश काय आहे त्याचा शोध घेण्यात आला. विद्यार्थ्यांचे आदोलन पेटण्यापूर्वी काही वेळ आधीच तिथे हिंदुस्तानी भाऊ आला होता. त्याला तिथे न थांबू देता पोलिसांनी तिथून बाहेर काढले. त्यानंतरच हे आंदोलन आणखी आक्रमक झाले. या हिंदुस्तानी भाऊला पोलिसांनी या ठिकाणाहून काढल्यानंतर हिंदुस्तानी भाऊने एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे, तो व्हिडिओ आता चांगलाच वायरल होत आहे.
या व्हिडिओतून भाऊने आपली बाजू मांडली आहे, करोना महामारी संपत नाही तोपर्यंत परीक्षा पुढे ढकला. तुम्ही सर्व बैठका ऑनलाईन घेता, मग विद्यार्थ्यांची परीक्षा ऑफलाईन का? हे विद्यार्थी देशाचं भविष्य आहेत. परीक्षा नको असं मी म्हणालोच नाही. फक्त ती परीक्षा पुढे ढकला. तसेच तीन महिन्यापासून विद्यार्थी माझ्या संपर्कात आहेत. मी आज सरकारला आवाहन करतोय की परीक्षा पुढे ढकला. अशी प्रतिक्रिया भाऊने दिली आहे.