योगी आदित्यनाथ यांनी दुसऱ्यांदा घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ

 

उत्तरप्रदेश | उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने दणदणीत विजय प्राप्त करून सर्व विरोधकांचा पराभव केला आहे. या विजयानंतर योगी आदित्यनाथ यांनी दुसऱ्यांदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. इकाना स्टेडियममध्ये शपथविधी सोहळा संपन्न झाला. राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. यावेळी अनेक दिग्गजांची उपस्थिती होती.

 

गुरुवारी योगी आदित्यनाथ यांची एकमताने विधीमंडळ नेतेपदी निवड झाली. योगी आदित्यनाथ यांची विधीमंडळ नेतेपदी निवड झाल्यानंतर भाजप नेत्यांनी राज्यपाल आनंदीबेन पटेल यांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला होता. उत्तर प्रदेशच्या इतिहासात तीन दशकांहून अधिक काळानंतर अशी संधी चालून आली आहे, की एखाद्या मुख्यमंत्र्यांने दुसऱ्या टर्मची पुनरावृत्ती केली. भाजपला मिळालेल्या मोठ्या जनादेशामुळे हे सर्व शक्य झाले आहे. त्यामुळं या ऐतिहासिक विजयानंतर योगींचा आज शपथविधी सोहळाही ऐतिहासिक ठरला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजप प्रदेक्षाध्यक्ष जे पी नड्डा, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, आसामचे मुख्यमंत्री हिंमत बिसवा सरमा, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, गुजरातचे मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल, हरियाणाचे मुख्यमंत्री एमएल खट्टर, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्यासह अनेक दिग्गज भाजप नेते उपस्थित होते.

Team Global News Marathi: