प्रकाश आंबेडकरांनी निवडणुकीत एक हजार कोटी घेतले, शिवसेना आमदार संतोष बांगर यांचे वादग्रस्त विधान

 

वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी निवडणुकीमध्ये एक हजार कोटी रुपये घेतल्याचा खळबळजनक आरोप शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी केला आहे. बांगर जवळा बाजार येथील शिव संपर्क अभियान दरम्यान आयोजित सभेमध्ये बोलत होते. आता त्यांच्या या आरोपांमुळे नव्या वादाला तोंड फुटले असून नवा वाद अंगावर ओढवून घेतला आहे.

ते म्हणाले की, सर्व बौद्ध समाजाने वंचित बहुजन आघाडीला मतदान केलं आणि तिकडे प्रकाश आंबेडकर यांनी एक हजार कोटी रुपये घेतले. नेहमीच वादग्रस्त वक्तव्या करणारे शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी पुन्हा एकदा नवा वाद निर्माण केला आहे. शिवसेना आमदार संतोष बांगर यांच्या आरोपानंतर राजकीय वातावरण तापण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिव संपर्क अभियान राबविण्यासाठी राज्यातील सर्व शिवसेना खासदार व आमदारांची बैठक घेतली होती. शिव संपर्क अभियान राबवून नवीन शिवसैनिक जोडण्यासाठी आणि पक्ष विस्तार करण्यासाठी कार्यक्रम जाहीर केला होता.

त्यानुसार प्रत्येक जिल्ह्याला निरीक्षक सुद्धा नेमलेले आहेत. हिंगोली जिल्ह्याचे निरीक्षक म्हणून कोल्हापूर लोकसभेचे खासदार संजय मंडलिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संजय मंडलिक यांच्या उपस्थितीमध्ये हिंगोली जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक सर्कलनुसार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात त्यांनी हे वादग्रस्त विधान केले आहे.

Team Global News Marathi: