“काल-परवा भाजपत घुसले आणि मंत्रीपदाची हळद लावून बोहल्यावर बसले”

 

आगामी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपातर्फे जन आशीर्वाद यात्रेचे आयोजन करण्यात आली होते. तसेच मुंबई मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केद्रिय मंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून मुंबईत जन आशीर्वाद यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. कोरोना हा फक्त देशातील सामान्य नागरिकांसाठीच आहे का?, हा एकच प्रश्न राजकारणी नेत्यांच्या वागण्याकडे बघून पडत आहे. सामान्य नागरिकांना गर्दी करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. पण नेत्यांच्या सभा आणि यात्रांना गर्दीचं कसलंही बंधन नाही. हा एकप्रकारे नियम पाळणाऱ्या जनतेवर अन्याय आहे.

भाजप आपल्या केंद्रीय मंत्र्यांच्या माध्यमातून लोकांचा आशिर्वाद घेण्यासाठी जात आहे. नवीन मंत्री हे आपापल्या भागाचा दौरा करत आहेत. या दौऱ्यात ते लोकांचा आशीर्वाद घेत आहेत. या सगळ्या दौऱ्यात हे नेते जनतेचा आशीर्वाद घेतानाचं विरोधकांवर प्रचंड टीका करताना पहायला मिळत आहेत. विरोधकांच्या या वागण्यावर संजय राऊत यांनी टीका केली आहे.

संजय राऊत म्हणाले, मोदी सरकारने त्यांच्या मंत्र्यांची एक जन आशीर्वाद जत्रा सुरू केली आहे. त्या जत्रेत फक्त विरोधकांविरोधात शिव्या- शाप देण्याचेचं काम सुरू आहे. या जन आशीर्वाद जत्रेतले अर्धे मंत्री हे विचार- आचाराने उपरे किंवा बाटगे आहेत. म्हणजे काल परवा भाजपत घुसले आणि मंत्रिपदाची हळद लावून बोहल्यावर चढले, अशी खरमरीत टीका राऊत यांनी केली होती.

Team Global News Marathi: