सावधान! सप्टेंबरमध्ये येणार कोरोनाची तिसरी लाट, दिवसाला 5 लाख रुग्ण सापडणार

सावधान! सप्टेंबरमध्ये येणार कोरोनाची तिसरी लाट, दिवसाला 5 लाख रुग्ण सापडणार

नीती आयोगाने हा  गंभीर इशारा दिला आहे

ग्लोबल न्यूज: कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आली आहे. देशाच्या अनेक राज्यांमध्ये निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. दैनंदिन व्यवहाराची गाडी पुन्हा रुळावर येतेय. लसीकरणाचा वेगही वाढला आहे. अशातच नीती आयोगाने एक गंभीर इशारा दिला आहे. येत्या सप्टेंबरमध्ये कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे.

तिसरी लाट इतकी भयंकर असेल की, दिवसाला 4 ते 5 लाख रुग्ण सापडतील. प्रत्येकी 100 पॉझिटिव्ह रुग्णांमागे 23 जणांना रुग्णालयात दाखल करावे लागेल. त्यामुळे सज्ज राहा आणि दोन लाख आयसीयू बेड तयार ठेवा अशी सूचनाही आयोगाने दिली आहे.

नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांच्या नेतृत्वाखालील गटाने केंद्र सरकारला हा सावधगिरीचा इशारा दिला आहे. गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यापासून कोरोनाच्या पहिल्या लाटेने जबरदस्त तडाखा दिला. त्यानंतर सप्टेंबर 2020 मध्ये दुसरी लाट येईल असा अंदाज नीती आयोगाने वर्तवला होता. ती लाट या वर्षी एप्रिल, मे महिन्यांत आली. संसर्ग इतका वेगाने होत होता की, रोज चार लाखांहून अधिक रुग्ण सापडत होते.

कोरोनाच्या दुसऱया लाटेतील रुग्णांच्या आकडेवारीचा अभ्यास करून नीती आयोगाने तिसऱया लाटेचे भाकीत वर्तवले आहे. 1 जून रोजी देशात 18 लाख कोरोनाग्रस्त रुग्ण होते. त्यातील 21.74 टक्के रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयांमध्ये दाखल करावे लागले होते. 2.2 टक्के रुग्णांना अतिदक्षता विभागांमध्ये (आयसीयू) उपचार द्यावे लागले होते.

ग्लोबल न्युज नेटवर्क: