यशोमती ठाकूर यांचा अजित पवारांवर गंभीर आरोप आता सुप्रिया सुळे म्हणतात की,

 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आम्हाला साथ दिली जात नाही, असा गंभीर आरोप काँग्रेस नेत्या आणि मंत्री यशोमती ठाकूर यांनी केला होता. आता अजित पवारांवर केलेल्या टीकेला राष्ट्रवादीच्या खासदार आणि अजित पवारांची बहीण सुप्रिया सुळे यांनी त्यावर उत्तर दिलं आहे.

अजित पवार हे सहकार्य करीत नाहीत असे जरी यशोमती ताई म्हणाले असल्या तरी त्यांच्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढू नका, असे आवाहन सुप्रिया सुळे यांनी केले आहे. सुप्रिया सुळे यांनी मीडियाशी संवाद साधताना हे आवाहन करतानाच यशोमती ठाकूर यांच्या बोलण्याचा विपर्यास केला जात असल्याचं स्पष्ट केलं.

यशोमती ठाकूर यांच्या भाषणाचा विपर्यास केला जातोय, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे त्यांनी काही मागणी केलीय. ते त्यावर विचार करतील, ताईंनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी अनाथ मुलांना निधी दिला आहे, मात्र तरी याबाबत कॅबिनेटमध्ये विचार केला जाईल, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Team Global News Marathi: