मनसे -भाजपा युतीला माझ्या शुभेच्छा असतील सुप्रिया सुळे यांनीं दिली प्रतिक्रिया

 

पुणे शहरात मागील काही दिवसांपासून येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा दौरा सातत्याने होत असून त्यांच्या भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या भेटीनंतर मनसे आणि भाजप युतीची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. यावर खासदार सुप्रिया सुळेंनी संमिश्र प्रतिक्रिया दिली आहे.

खासदार सुळे म्हणाल्या “कोणी युती करावी किंवा आघाडी करावी, हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. जर त्यांनी केलीच तर माझ्या त्यांना शुभेच्छा असतील.” पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या. त्यामुळे मनसे भाजपा युतीवर राष्ट्र्वादीने सूचक प्रतिक्रिया देत यावर बोलणे टाळले आहे.

मागच्या काही दिवसापासून राज ठाकरे आणि शरद पवार यांच्यात जातीपातीच्या राजकारणावरून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपायाच्या फेऱ्या सुरु झाल्या आहेत. राज ठाकरेंनी राष्ट्रवादीवर तोफ डागल्यानंतर त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. अजित पवारांबरोबरच राष्ट्रवादीचे पदाधिकारी त्यावर उत्तरे देत आहेत.

Team Global News Marathi: