यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांना, गरिबांना केलं हद्दपार, काँग्रेसची टीका

 

नवी दिल्ली | केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी आज रोजी केंद्रीय अर्थसंकल्प 2023 संसदेत सादर केला. यावेळी अर्थमंत्री सितारमन यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत.नरेंद्र मोदी यांच्या काळातील हे नववे बजेट आहे, तर निर्मला सितारमन यांनी सलग पाचव्यांदा अर्थसंकल्प सादर केला.केंद्रातील मोदी सरकारचा हा निवडणूकपूर्वीचा अर्थसंकल्प असल्याने सर्वांचेच या अर्थसंकल्पाकडे लक्ष लागून राहिले होते.

आज (बुधवार) सकाळी राष्ट्रपती दौपती मुर्मू यांनी केंद्रीय अर्थसंकल्पाला औपचारिक मंजूरी दिली. त्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीतही अर्थसंकल्पाला मंजूरी देण्यात आली. आता या अर्थसंकल्पावर सत्तधाऱ्यांनी कौतुक केलेलं असताना विरोधकांनी मात्र निशाणा साधला आहे यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांना, गरिबांना हद्दपार केल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.

ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत व्हावी, ग्रामीण भागात रोजगार निर्माण व्हावा, यासाठी या अर्थसंकल्पात काहीच नाही. देशातील मुख्य कणा असणाऱ्या ओबीसी समाजासाठी, आदिवासी आणि शेड्युल कास्टच्या योजनांना या अर्थसंकल्पातून कात्री लावली असल्याची टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. डिजिटलायझेशनवर केवळ भर दिला असून निवडणुका नजरेसमोर ठेवून अर्थसंकल्प सादर केलेले आहे. तर निवडणुका नसल्याने महाराष्ट्राच्या तोंडाला केवळ पानं पुसली असल्याची टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

Team Global News Marathi: