यंदा शाळांना उन्हाळ्याची सुट्टी नाही, वाचा सविस्तर वृत्त

 

मुंबई | कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. अजूनही कोरोना पूर्णपणे नष्ट झालेला नाही. कोरोना काळात शाळा व महाविद्यालय बंद ठेवण्यात आले असून ऑनलाइन शिक्षणावर भर देण्यात आला होता. त्यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. तर ती कमी भरून काढण्यासाठी यावर्षी शाळा व कॉलेजेस सुरू असणार आहे.

मागील काही दिवसांपासून कोरोनाची समाधानकारक परिस्थिती दिसत होती. त्यामुळे शाळा आणि कॉलेजेस सुरू करण्यात आले होते. मागील कालावधी भरून काढण्यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून येत्या मार्च आणि एप्रिल महिन्यात शाळा संपूर्ण उपस्थितीसह सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.

सर्वसाधारणपणे दरवर्षी मार्च महिन्यात शाळा सकाळच्या सत्रात भरण्यास सुरुवात व्हायची. परंतु यावर्षी पहिली ते नववी आणि इयत्ता अकरावीचे वर्ग पूर्णवेळ सुरू असणार आहेत, असा आदेश राज्य शाळेय शिक्षण विभागाने दिला आहे. त्यामुळे यंदा अनेकांनी गावी जाण्याचा प्लॅन केला तर त्यांना तो रद्द करावा लागणार आहे.

Team Global News Marathi: