यंदा बाबासाहेब आंबेडकरांची जयंती होणार उत्साहात साजरी – उद्धव ठाकरे

 

मुंबई | कोरोना संसर्गामुळे गेल्या दोन वर्षांपासून महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीवर सावट होते. मात्र यंदा बाबासाहेब आंबेडकरांची जयंती उत्साहात साजरी होण्यार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. मंगळवारी सहयाद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला. तसेच महापरिनिर्वाण दिनाप्रमाणेच १४ एप्रिल रोजी राज्यशासनामार्फत हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यास गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी मान्यता दिली असून त्यासंदर्भात कार्यवाही करण्याचे निर्देशही प्रशासनाला देण्यात आले आहेत.

१४ एप्रिल रोजी रोजी होणाऱ्या १३१ व्या जयंतीनिमित्त चैत्यभूमी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या तयारीसंदर्भात काल सहयाद्री अतिथीगृह आयोजित बैठकीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दूरदृश्यप्रणालीव्दारे उपस्थित होते त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.

यावेळी मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, “गेली दोन वर्षे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती उत्सव व पुण्यतिथीनिमित्त अभिवादन अशा दोन्हीही कार्यक्रमात आपण कोरोना निर्बंधांमुळे अतिशय संयम पाळला आणि नियमांचे काटेकोर पालन केले, ही खरोखरच खूप महत्वाची आणि मोठी गोष्ट आहे. आता हे कोरोनाचे सावट कमी झाले आहे आणि या महामानवाची जयंती आपणा सर्वांना उत्साहाने साजरी करायची आहे असे त्यांनी यावेळी बोलून दाखविले होते.

Team Global News Marathi: