‘या’ अभिनेत्रीने शेअर केला टॉपलेस फोटो, सोशल मीडियावर होतोय तुफान व्हायरल

मुंबई: सुप्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आणि नुकतीच लूडो या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी आशा नेगी (asha negi) ही सोशल मीडियावर  बरीच अ‍ॅक्टिव्ह असते आणि वारंवार स्वतःशी संबंधित पोस्ट्स शेअर करत असते. आशा सध्या तिच्या मित्र-मैत्रिणींसमवेत हिमाचल प्रदेश मध्ये सुट्टी एन्जॉय करत आहेत आणि सतत तेथील सुंदर फोटो शेअर करत आहेत. या सर्वांच्या दरम्यान तिने अलीकडेच त्याचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यामुळे ती खूपच चर्चेत आली आहे.

आशाने अलीकडेच एक असा फोटो शेअर केला आहे जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral) होत आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये ती टॉपलेस (Topless) आहे. ब्लॅक अँड व्हाईट फोटोमध्ये  आरशासमोर टॉवेल्समधील टॉपलेस फोटो तिने शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना आशाने लिहिले की, ती हा फोटो नंतर डिलीट करु शकते. आशा नेगीचा हा फोटो सोशल मीडिया सेलिब्रिटींनी आणि त्यांच्या चाहत्यांना खूपच आवडला आहे आणि त्यावर सतत कमेंट देखील करत आहेत. तसंच अभिनेत्रीचे कौतुक सुद्धा करत आहेत.

आशा नेगीच्या या फोटोवर प्रतिक्रिया देताना अभिनेत्री किश्चर मर्चंटने ‘हॉटनेस’ अशी कमेंट केली आहे. या फोटोवर कमेंट करताना अभिनेत्री रिद्धि डोगरा हिने लिहिले, ‘लव’. तर आशाचे चाहते म्हणतात की तिला हा फोटो डिलिट करण्याची गरज नाही, कारण तो खूपच सुंदर आहे.

आशा नेगीने बर्‍याच टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे ज्यामध्ये सपनों से भरे नैना, बड़े अच्छे लगते हैं, पवित्र रिश्ता, शुभ विवाह, पुनर्विवाह, सपने सुहाने लड़कपन के, कुबूल है, एक मुट्ठी आसमान, कुमकुम भाग्य आणि कुछ तो है तेरे मेरे दरमियां या मालिकांचा समावेश आहे. याशिवाय ती बिग बॉस 6 आणि नच बलिये 6 या रिअॅलिटी शोमध्ये सुद्धा दिसली आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: