‘या’ प्रकरणात अखेर आरोपपत्र दाखल, फडणवीसांच्या अडचणी अधिक वाढणार ?

 

मुंबई | पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी केलेल्या फोन टॅपिंग प्रकरणाला आता निर्णायक वळण लागले आहे. या प्रकरणी पोलिसांनी अखेरीस आरोपपत्र दाखल केलं आहे. यामध्ये शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचा तब्बल 60 दिवस फोन टॅप करण्यात आला होता तर एकनाथ खडसे यांचा 67 दिवस फोन टॅप करण्यात आला होता, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे फोन टॅपिंग प्रकरणी कुलाबा पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले आहे. किल्ला कोर्टात हे ७०० पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणात २० साक्षीदारांचे जबाब आरोपपत्रात समाविष्ट आहे. तर ६ सरकारी कर्मचाऱ्यांचे आरोपपत्रात जबाब असून CRPC 164 नुसार हे जबाब नोंदवले गेले आहेत. या ६ सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये तत्कालीन गृहसचिव, पोलीस उप अधिक्षकांचा जबाब आहे. तर, राजकीय नेत्यांमध्ये संजय राऊत आणि एकनाथ खडसे यांचे जबाब आहेत.

२०१९ साली महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू होती या वेळेस संजय राऊत यांचे 60 वेळा तर एकनाथ खडसे यांचे ६७ वेळा फेन टॅप केले गेले होते. संजय राऊत यांचे फोन टॅपिंग एस रहाटे या नावाने तर खडसाने नावाने एकनाथ खडसे यांचे फोन टॅप केले जात होते. समाज विरोधी कृत्य करणारे असं सांगून फोन टॅपिंग केले जात होते. याआधाही राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पहिल्यांदाच कुणा-कुणाचे फोन टॅप झाले होते, याची माहिती काही दिवसांपूर्वीच जाहीर केली होती.

Team Global News Marathi: