चिंताजनक: पुणे शहरात एका दिवसात तब्बल 465 नवे रुग्ण; सहा जणांचा मृत्यू

ग्लोबल न्यूज : पुण्यात आज दिवसभरात 465 नवे रुग्ण सापडले. तर 184 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. संथ गतीने रुग्णसंख्येत वाढ होत असल्यामुळे चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.

आज करोनाबाधीत 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण 154 गंभीर रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 308 जण ऑक्सिजन बेडवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 1 लाख 96 हजार 389 इतकी झाली आहे. तर ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 2156 वर पोहोचली आहे. आजपर्यंत एकूण 4812 रुग्णांचा मृत्यू झाला.

 

तरीही नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी. तोंडाला मास्क, हात धुणे आणि शारिरीक आंतरपालन करण्याचे आवाहन पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: