Big Breaking– आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना कोरोनाची लागण

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना कोरोनाची लागण झाली आहे. आज गुरुवारी त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आरोग्यमंत्र्यांनी स्वत: ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे.

‘माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने कोरोनाला हरवून लवकरच मी आपल्या सेवेत रुजू होईल. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि लक्षणे दिसल्यास तत्काळ आपली कोरोना चाचणी करून घ्यावी’, असे ट्विट आरोग्यमंत्र्यांनी केले आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: