चिंताजनक: गेल्या 24 तासांत देशात 28,903 नवे कोरोना रुग्ण, 188 मृत्यू

ग्लोबल न्यूज – देशात कोरोना रुग्णांची वाढ निरंतर सुरूच आहे. मागील 24 तासांत देशभरात 28 हजार 903 नव्या कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली आहे तर, 188 रुग्णांचा मृत्यू झाला. महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात आणि तमिळनाडू या राज्यांत नव्यानं वाढ होणा-या रुग्णांची संख्या अधिक आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 कोटी 14 लाख 38 हजार 734 एवढी झाली आहे. त्यापैकी 1 कोटी 10 लाख 45 हजार 284 जण कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या 24 तासांत 17 हजार 741 बरे झालेल्या रुग्णांना

डिस्चार्ज देण्यात आला.

आयसीएआरने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशात आजवर 22 कोटी 92 लाख 49 हजार 784 नमूने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 9 लाख 69 हजार 021 चाचण्या मंगळवारी (दि.16) रोजी करण्यात आल्या आहेत.

ग्लोबल न्युज नेटवर्क: