चिंताजनक: पुण्यात गुरुवारी आढळले 2 हजार 284 नवे रुग्ण

ग्लोबल न्यूज: शहरात गुरुवारी 2 हजार 284 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. एका दिवसात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 479 ने वाढली आहे. बुधवारी शहरात 1 हजार 805 कोरोनाबाधित आढळून आले होते. शहरातील बाधितांची टक्केवारी अर्थाव पॉझिटिव्हिटी रेट 14.47 टक्के इतका नोंदवला गेला आहे. आठ महिन्यांनी रुग्णसंख्येने 2000 चा टप्पा ओलांडला आहे.

 

शहरात रुग्णांची संख्या वाढत असताना शहरात मृत्यूचे प्रमाण कमी असल्याने दिलासा मिळाला आहे.आज शहरात 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील तीन आणि शहराबाहेरील एका रुग्णाचा समावेश आहे.आजपर्यंत शहरात 9 हजार 122 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

सध्या शहरामध्ये 7 हजार 665 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (असून यामध्ये 106 रुग्ण ऑक्सिजनसह उपचार घेत आहेत. तर 13 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.

ग्लोबल न्युज नेटवर्क: