चिंताजनक : राज्यात १८८१ नव्या कोरोना रुग्णांची नोंद ; देशातही ४१ टक्क्यांनी रुग्णवाढ

चिंताजनक : राज्यात १८८१ नव्या कोरोना  रुग्णांची नोंद ; देशातही  ४१ टक्क्यांनी रुग्णवाढ

देशात मागील काही दिवसांपासून करोना संसर्गामध्ये वाढ होत आहे. महाराष्ट्रासह इतर राज्यांतही रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे दिसतेय.

देशात मागील काही दिवसांपासून करोना संसर्गामध्ये वाढ होत आहे. महाराष्ट्रासह इतर राज्यांतही रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे दिसत आह. दरम्यान, बुधवारी देशात ५२३३ नव्या करोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. मंगळवारच्या तुलनेत ही रुग्णसंख्या ४१ टक्क्यांनी जास्त आहे. या रुग्णवाढीमुळे आता चिंता व्यक्त केली जात असून खबरदारी घेण्याचे आवाहन केले जात आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात सध्या करोना रुग्णसंख्येने मागील ९३ दिवसानंतर पाच हजारांचा टप्पा पार केला आहे. बुधवारी ५२३३ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली. या रुग्णसंख्येसह सध्या देशात २८ हजार ८५७ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

महाराष्ट्र राज्यातही करोना रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. येथे सार्वजनिक ठिकाणी तोंडाला मास्क लावण्याचे आवाहन केले जात आहे. मंगळवारी राज्यात १८८१ सक्रिय करोना रुग्ण आठळले आहेत.

१८ फेब्रुवारीपासून ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. सध्या महाराष्ट्र राज्यात ओमिक्रॉनच्या बीए ५ या उपप्रकाराची लागण झालेला एक रुग्ण आढळला आहे. मुंबईत मंगळवारी १२४२ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली. सोमवारी आढळलेल्या रुग्णसंख्येच्या तुलनेत ही रुग्णसंख्य जवळपास दुप्पट आहे.

दरम्यान, वाढत्या करोना रुग्णांमुळे देशावर चौथ्या करोना लाटेचे संकट उभे ठाकले आहे. महाराष्ट्र राज्यात माससक्ती नसली तरी सर्वजनिक ठिकाणी मास्क वापरण्याचे आवाहन केले जात आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: