महिला, आदिवासी, दलित केंद्रीय मंत्री बनलेत, पण काहींना ते आवडलेले दिसत नाही, पहिल्या दिवशी मोदींनी विरोधकांना झापले !

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्री मंडळाच्या विस्तारात अनेक समाजाच्या चेहऱ्यांना सनदी देण्यात आली आहे. त्यातच केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल केल्यानंतरचे संसदेचे हे पहिलेच अधिवेशन असून पहिल्या दिवशी नवीन मंत्र्यांची ओळख करून देण्यासाठी मोदी उठले तेव्हा विरोधकांनी फोन टॅपिंग, इंधन दरवाढ या विषयावर गदारोळ करण्यास सुरूवात केली.

यावेळी पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांना चांगलेच झापले होते. देशाच्या स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात महिला, आदिवासी, दलित समूदायातील नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना केंद्रात मंत्रीपदाची संधी मिळाली आहे. ते आपापल्या क्षेत्रात कर्तृत्ववान व्यक्ती आहेत. मात्र महिला, दलित आणि आदिवासी समुदायांना केंद्रात स्थान दिलेले काही जणांना आवडलेले दिसत नाही असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला होता.

मात्र आदिवेशनाच्या तत्पूर्वी मोदी यांनी डोस घेतलेल्या व्यतींबद्दल एक विधान करून संसदेत हलके फुलके वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, की देशातले ४० कोटी कोरोनाविरुध्दच्या लढाईत आता बाहुबली बनलेत से त्यांनी बोलून दाखविले.

 

Team Global News Marathi: