पेट्रोल डिझेल दरवाढीवरून आमदार रोहित पवारांचा मोदी सरकारला जोरदार टोला |

 

एकीकडे देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका निर्माण झालेला असताना दुसरीकडे इंधन आणि घरगुती गॅसच्या वाढत्या किमतीवरून सर्वसांना नागरिकांना महागाईचा सामना करावा लागत आहे. आज पेट्रोल डिझेलचे दर गगनाला भिडले असून विरोधक याच मुद्द्यावरून केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधत असतात .

राज्यात तर ठिकठिकाणी राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना पक्षाकडून वाढत्या महागाईवरून निदर्शने करण्यात आली. तसेच जागोजागी वाढत्या इंधन दरवाढीवरुन आंदोलने केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मोदी सरकार वर टीका खोचक टीका केली आहे.

महागाईच्या ओणव्यात आज सामान्य माणूस भाजून निघतोय, पण चक्क दोन दिवसांपासून पेट्रोल-डिझेलचे दर वाढले नाहीत. कदाचित आजपासून सुरू होणाऱ्या संसद अधिवेशनात टीकेची तीव्रता कमी व्हावी म्हणून ते स्थिर असावेत! पण काही का असेना, यामुळं केंद्र सरकारचे मानावे तेवढे आभार कमी आहेत! असा खोचक टोला रोहित पवार यांनी केंद्राला लगावला आहे.

 

Team Global News Marathi: