महिला सुरक्षितेचे विषय किमान राजकारणापलीकडे असला पाहिजे – देवेंद्र फडणवीस

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून राज्यातील वातावरण चांगलेच तापू लागले आहे.त्या या प्रकरणात शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांचे नाव आल्यानंतर या प्रकरणाला वेगळेच वळण लागले होते. त्यात राठोड यांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावर भाजपा ठाम असून यासाठी शनिवारी भाजपा महिला आघाडीतर्फे जागोजागी आंदोलन करण्यात आले होते. यावर आता राज्याचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य करत आघाडी सरकारला टोला लगावला आहे.

सरकार हे नेहमी पालकत्त्वाच्या भूमिकेत असले पाहिजे. आमची मागणी आहे की, केवळ दबावाचे, गळचेपीचे राजकारण न करता सरकारने आधी दोषींवर कठोरातील कठोर कारवाई करावी. महिला सुरक्षेचे विषय तरी किमान राजकारणाच्या पलिकडे असले पाहिजे असे त्यांनी यावेळी बोलून दाखविले. ते मुंबईत प्रसार माध्यमांशी बोलत होते.

पुढे बोलताना ते म्हणाले की, सरकार दोषींवर कारवाई करीत नाही. पण, आंदोलन करणार्‍या महिलांचेच अटकसत्र राबविण्यात सरकारला अधिक धन्यता वाटते. भाजपाच्या महिला नेत्यांच्या छायाचित्रांशी छेडछाड करणार्‍या विकृतीवर कारवाईची तत्परता न दाखविता, केवळ आवाज दडपण्याच्या या दबावतंत्राचा आम्ही तीव्र निषेध करतो, असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

Team Global News Marathi: