संजय राऊत यांचे सूचक ट्विट, लवकरच देणार मंत्री संजय राठोड मंत्रीपदाचा राजीनामा

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांचं नाव पुढे आल्यानंतर विरोधकांनी आघाडी सरकारवर दबावतं त्रा चा वापर करून राठोड यांचा राजीनामा मागितला होता. शनिवारी भाजपाच्या महिला मोर्च्याच्या कार्यकर्त्यांनी राज्यभरात याच मुद्द्यावरून आंदोलन सुद्धा केले होते.

त्यातच शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी राठोड प्रकरणात सूचक ट्विट केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा एक फोटो ट्विट करत महाराजांच्या हातातील राजदंड काय सांगतो? असे सूचक ट्विट त्यांनी केले आहे.

“महाराजांच्या हातातील राजदंड काय सांगतो? महाराष्ट्र धर्म म्हणजेच राजधर्माचे पालन”, असे लिहिलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो संजय राऊत यांनी ट्विट केला आहे. थोडक्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वतीने राऊत यांनी ट्विट करत राठोड यांना एकप्रकारे इशारा दिल्याचे बोलले जातं आहे. अर्थातच संजय राठोड यांना राजीमाना देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.

विधिमंडळ अधिवेशनाला आता अवघे काही तास उरलेले आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर विरोधक आक्रमक झाले आहेत. राठोड यांचा राजीमाना घेतल्याशिवाय सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही असा इशारा विरोधकांनी दिला होती. याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगताना दिसत आहे.

Team Global News Marathi: