महिला आमदाराचा कथित अश्लील व्हिडीओ व्हायरल; एकाला अटक

 

लाहोर | आजवर आपण महिलांवर होणाऱ्या अत्याचाऱ्यांच्या घटनेवरून त्यांना ब्लँकमेल करण्यात आलेले प्रकार आजवर पहिले असेल मात्र लाहोरमध्ये महिला आमदाराच्या कथित सेक्स व्हिडिओमुळे एकाच खळबळ उडाली आहे. पाकिस्तानमधील एका महिला आमदाराचा कथित अश्लील व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ व्हायरल केल्या प्रकरणी आणि धमकावल्याच्या गुन्ह्याखाली एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.

ज्या महिला आमदाराचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे तिचे नाव सानिया आशिक असे आहे. सानिया यांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी अटकेची कारवाई केली आहे. पाकिस्तानमधील एका वृत्तवाहिनीच्या माहितीनुसार, सानिया आशिक पाकिस्तानच्या मुस्लीम लीग नवाजच्या सदस्य आहेत. त्या पंजाब प्रांतातील तक्षशिला येथील आमदार आहेत.

पाकिस्तानमध्ये नुकताच एक अश्लील व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हायरल व्हिडीओ एका रुममध्ये शूट करण्यात आला आहे. यामध्ये एक महिला नग्नावस्थेत दिसत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये ही महिला आमदारच असल्याचा दावा केला जात आहे. या महिला आमदाराच्या नावानेच हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हे प्रकरण लक्षात आल्यानंतर सानिया यांनी पोलिसांकडे यासंदर्भात तक्रार नोंदवली.

Team Global News Marathi: