“शरद पवारांचा एसटी महामंडळाच्या जागेवर डोळा म्हणून खासगीकरणाची चर्चा”

राज्यात एसटी महामंडळाच्या आंदोलनावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शीतयुद्ध सुरु झाले आहे. त्यातच या आंदोलवरून विरोधकांनी थेट राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. मागच्या पन्नास वर्षांपासून एसटी कर्मचाऱ्यावर अन्याय होत आहे. आम्ही बोललो कि भाजप त्यात राजकारण करतंय असा आरोप आमच्यावर होतो.

कर्मचाऱ्यांचे निलंबन व बडतर्फची नोटीस दिल्यावर आता सरकार एसटी महामंडळाच्या खासगीकरणाची चर्चा करीत आहे. शरद पवारांचा एसटीच्या जागेवर डोळा असल्याने अशी चर्चा होत असल्याचा घणाघाती आरोप भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. गोपीचंद पडळकर पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.

राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे या मागणीसाठी राज्यातील एसटी कर्मचारी संपावर गेले आहेत. जवळपास एक महिना झाला एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. या संपाच्या समर्थनार्थ भाजप आमदार गोपीचंद पडळकर हे देखील संप करणाऱ्या कर्मचाऱ्यांसोबत मुंबईत आझाद मैदानात गेल्या १० दिवसांपासून ठाण मांडून बसले होते. त्यानंतर ते काल संध्याकाळी पुण्यात आले.

पडळकर म्हणाले, ह्या सरकारला सत्तेचा माज आला आहे. कर्मचाऱ्यांवर अन्याय केला जात आहे. कोल्हापूरला झालेल्या एसटी अधिवेशनात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले होते 15 दिवसांत एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण झाले पाहिजे. तसेच 2019 च्या जाहीरनाम्यात देखील राष्ट्रवादीने एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करु असे सांगितले होते. आता मात्र तेच विरोध करत असल्याचे पडळकर म्हणाले.

Team Global News Marathi: