नागपूर | सध्या राज्यात महिला आणि मुलींच्या अत्याचाऱ्यांच्या घटनेत वाढ झाली असून दिवसेंदिवस तक्रारीचा आलेख वाढताना दिसून येत आहे. अशातच आता महिलांच्या संरक्षणासाठी मागच्या वर्षभरापासून नागपुरात दामिनी पथक काम करत असून आज तागायत अनेक महिलांच्या मदतीसाठी हे पथक धावून गेले आहे.
या पथकाच्या महिला शिपायांनी आतापर्यंत आत्महत्तेपासून परावृत्त करणे. छेडछाड तक्रारीत मदत करणे. वयोवृद्धांना सहकार्य करणे हे दामिनी पथकाचं काम आहे. याशिवाय मनोरुग्ण महिलांनामदत केली जाते. तसेच महिलांविषयी प्रश्नवेर जनजागृती केली जाते. दर्शन कार्यक्रमात मार्ग दाखविला जातो.
मुली, महिलांना संरक्षण देण्यासाठी पोलीस आयुक्त कार्यालयाअंतर्गत हे पथक कार्यरत आहे. महिला किंवा मुलींना फोन करताच दामिनी पथक घटनास्थळी जाऊन त्यांना मदत करते. प्रसंगी दंडुका दाखवून छेडखानी करणाऱ्यांची धुलाई केली जाते.
शाळा, कॉलेज सुटल्यानंतर रोड रोमियो मुलींना टार्गेट करतात. शाळेच्या गेटसमोर उभे राहतात. अशावेळी मुख्याध्यापकांनी दामिनी पथकास कळविल्यास दामिनी पथक तिथं येते. रोड रोमियोंवर नजर ठेवते. मुलींवर वाईट नजर ठेवली, तर दंडुकांचा मार देते. या पथकामुळे महिलांना मोठा आधार मिळताना दिसून येत आहे.