भाजपा खासदाराच्या मुलावर शारीरिक शोषणाचा महिलेचा आरोप

 

भाजपा आमदार, खासदार आणि मंत्र्यांवर यापूर्वी सुद्धा महिलांच्या अत्याचाऱ्याच्या केसेस झालेल्या आहेत. त्यातच आता वर्ध्यातून आलेल्या अशाच एका बातमीमुळे खळबळ उडाली आहे. भाजपचे खासदार रामदास तडस यांचे पुत्र पंकज तडस याने आपल्याला लग्नाचे आमिष दाखवीत शारीरिक शोषण केल्याची तक्रार वर्धा शहरातील रहिवासी असलेल्या तरुणीने नागपूर येथील विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे केली आहे.

या आरोपामुळे एकाच खळबळ दाली आहे. यापूर्वी वर्धा येथील पोलीस अधीक्षकांकडेही याप्रकरणी तक्रार करण्यात आली होती. त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यानंतर हे प्रकरण आता कौटुंबिक न्यायालयात दाखल असल्याचे खा. रामदास तडस यांनी सांगितले आहे. तर खासदार पूत्र पंकजने कोऱ्या कागदांवर सह्या घेऊन बनावट विवाहाचे चित्र उभे करीत आपली फसवणूक केली, असा आरोप पीडित मुलीने केला आहे.

खा. तडस यांचे पुत्र पंकज तडस याने वर्धा शहरातील एका मुलीसोबत सूत जुळविले होते. त्यानंतर दोघांनीही ६ ऑक्टाेबर २०२० राेजी विवाह केला. काही काळ ते वर्धा शहरात वास्तव्याला होते. त्यानंतर सदर पीडित मुलगी देवळी येथे तडस यांच्या घरीही राहण्यास गेली होती. मात्र, कालांतराने दोघांत वितुष्ट आल्याने हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले.

याप्रकरणी वर्धा पोलिसांनी चौकशी अहवालही तयार केला आहे. आता या प्रकरणात मुलीने पोलीस महानिरीक्षकांकडे धाव घेतली असून, या तक्रारीत गैरअर्जदार म्हणून पंकज तडस, खा. रामदास तडस व यांच्या पत्नी शोभा तडस, मुलगी सुनीता तडस यांचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणात नागपूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक काय कार्यवाही करतात याकडे लक्ष लागले आहे.

Team Global News Marathi: