सिद्धार्थ शुक्ला प्रकरणी मोठी बातमी पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा नोंदवला

 

अभिनेता आणि बिग बॉस विजेता सिद्धार्थ शुक्ला मृत्यू प्रकरणी पोलीस आता तपासाला लागली आहे. समोर आलेल्या वैद्यकीय अहवालानुसार सिद्धार्थचा ह्रदविकाराच्या धक्काने मृत्यू झाला आहे. पण, त्याचा विसरा वैद्यकीय तपासणीसाठी ठेवण्यात आला आहे. या चाचणीनंतर त्याच्या मृत्यूचे कारण समोर येईल. सिद्धार्थ शुक्लाचं २ सप्टेंबर रोजी सकाळी निधन झालं. मुंबई पोलिसांनी सुद्धा सिद्धार्थच्या मृत्यू प्रकरणी अपघाती गुन्हा दाखल केला आहे. सिद्धार्थ ज्या दिवशी ह्रदयविकाराचा धक्का आला होता, त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याच दरम्यान त्याचा मृत्यू झाला, असं पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये आढळून आलं आहे. त्यामुळे पोलिसांनी नियमांप्रमाणे अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.

सिद्धार्थच्या गाडीची मागची काच फुटली होती तर दुसरीकडे, सिद्धार्थच्या मृत्यूनंतर आणखी एक गोष्ट समोर येत आहे, असे सांगितले जात आहे की, आदल्या रात्री सिद्धार्थ शुक्ला त्याच्या बीएमडब्ल्यू कारने आपल्या घरी पोहचला, त्यावेळी कारची मागील काच फुटलेल्या अवस्थेत होती. सिद्धार्थच्या गाडीची ती अवस्था पाहून आता बरेच तर्क-वितर्क लावले जात आहेत, सिद्धार्थची काल रात्री कोणाशी भांडण झालं का? किंवा रात्री काय घडले ज्यामुळे त्याच्या कारची मागील काच फुटली? ज्यामुळे तो रात्रभर अस्वस्थ होता?

कुटुंबाचा कोणावरही संशय नाही सिद्धार्थच्या कुटुंबीयांनी पोलिसांना कोणावरही संशय नसल्याचे सांगितले आहे. कूपर हॉस्पिटलचे डॉ. निरंजन यांनी त्याच्या मृत्यूबाबत डेथ बिफोर अरायव्हल सांगितले आहे. सध्या सिद्धार्थच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टची प्रतिक्षा आहे.

Team Global News Marathi: