प्रकाश आंबेडकरांशिवाय रिपब्लिकन ऐक्य अशक्य’ – रामदास आठवले

 

कल्याण – काही दिवसापूर्वी पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी प्रकाश आंबेकरांना वगळून रिपब्लीकन ऐक्स केले जाणार असल्याचे वक्तव्य केले होते. मात्र यावर आता रिपाई पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी भाष्य केले आहे. प्रकाश आंबडेकरांना वगळून रिपब्लीकन ऐक्य शक्य नाही असं विधान मंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.

कल्याणनजीक असलेल्या गोवेली येथील जीवनदीप महाविद्यालयाच प्राचार्य धनाजी गुरव यांच्या शोकसभेला केंद्रीय मंत्री आठवले हे आज उपस्थित होते. या प्रसंगी भाजप आमदार किसन कथोरे, महाविद्यालयेच अध्यक्ष रविंद्र घोडविंदे आणि रिपब्लीकन पक्षाचे पदाधिकारी उपस्थीत होते.

या शोकसभे पश्चात केंद्रीय मंत्री आठवले यांनी उपरोक्त वकव्य केले आहे. आठवले यांनी सांगितले की, कवाडे हे आमचे ज्येष्ठ नेते आहे. त्यांच्या ऐक्याच्या भूमिकेला माझा पाठिंबा आहे. मात्र प्रकाश आंबेडकरांशीशिवाय ऐक्य अशक्य आहे. त्यांना घेऊन ऐक्य केल्यास त्यांच्या अध्यक्षतेखाली काम करण्यास मी तयार आहे. आंबेडकरांच्या पक्षात रिपब्लीकन नाव नसेल. मात्र त्यांचे काम रिपब्लीकन पक्षाप्रमाणेच आहे असे सुद्धआठवले यांनी यावेळी बोलून दाखविले होते.

Team Global News Marathi: