विराट कोहलीला निलंबित करायला हवं किंवा दंड वसूल करायला हवा!

दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकण्याचे भारताचे स्वप्न अधुरे राहिले. आफ्रिकेनं दमदार कमबॅक करताना तीन सामन्यांची मालिका ०-१ अशा पिछाडीवरून २-१ अशी जिंकली.तिसऱ्या कसोटीत विजय मिळवण्यासाठी भारतीय कर्णधार विराट कोहली यानं सारे प्रयत्न करून पाहिले. पण, आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गर व किगन पीटरसन हे त्याच्या मार्गात शड्डू ठोकून उभे राहिले. त्यामुळे विराटची चिडचिड झाली.आता त्याला निलंबित करा किंवा दंडात्मक कारवाई करा अशी मागणी इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन यानं केली आहे.

तिसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी आर अश्विननं टाकलेल्या २१व्या षटकातील एक चेंडू दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गरच्या पॅडवर आदळला अन् सर्वांना जोरदार अपील केले. मैदानावरील पंच एराम्सस यांनी लगेच बोट वर केले. मोठी विकेट मिळाली म्हणून भारतीय खेळाडू आनंदात होते. पण, एल्गरनं लगेच DRS घेतला. चेंडू यष्टींवर आदळत असल्याचा विश्वास सर्वांनाच होता, पण रिप्लेत चेंडू स्टम्प्सच्या वरून जाताना दिसला अन् एराम्सस यांना निर्णय बदलावा लागला. त्यावेळेस त्यांनीही हे शक्य नाही अशीच प्रतिक्रिया दिली.

विराट मात्र संतापला अन् षटक संपल्यानंतर स्टम्प्स माईककडे जाऊन बडबडला. तो म्हणाला, तुमचा संघ जेव्हा चेंडू चमकवतात तेव्हा त्यांच्यावरही लक्ष ठेव, फक्त प्रतिस्पर्धी संघावर नको. लोकांचं लक्ष वेधण्याचा सतत प्रयत्न करत असतोस. उप कर्णधार लोकेश राहुल हाही तेव्हा म्हणाला की, संपूर्ण देश मिळून ११ खेळाडूंविरुद्ध खेळतोय. मात्र यावर वॉर्न म्हणाला की, जिंकण्यासाठी कोणतातरी दूसरा मार्ग शोधा,आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचा कर्णधार असल्याचे भान ठेऊन कोहलीनं परिपक्वपणे वागायला हवं. त्याच्यावर दंडात्मक कारवाई करायला हवी किंवा निलंबित करायला हवं, अशी मागणी वॉननं केली.

Team Global News Marathi: