महिन्याभरात सीएनजी गॅसचे दर पुन्हा वाढले, सामान्य नागरिकांना वाढत्या इंधनदरवाढीचा बसणार फटका

 

एकीकडे पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ कायम असतानाच सीएनजी गॅसचे दर पुन्हा भडकले आहेत. सीएनजी गॅसच्या दरात ऑक्टोबर महिन्यात झालेली ही दुसरी वाढ आहे. इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडने राजधानी दिल्लीसह अनेक शहरात सीएनजीच्या किंमतीत वाढ जाहीर केली आहे. सीएनजी गॅसचे वाढलेले नवे दर बुधवारपासून लागू होणार आहेत.

इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडने सीएनजी गॅसच्या किंमतीत 2.28 रूपये प्रति किलोने वाढ जाहीर केली आहे. मुंबई आणि उपनगरात आता सीएनजीचा दर 54.57 रूपये प्रतिकिलो इतका आहे. तर राजधानी दिल्लीत सीएनजी गॅसची किंमत वाढून 49.76 रुपये प्रतिकिलो इतकी झाली आहे. 12 दिवसांतच सीएनच्या गॅसचे दर दुसऱ्यांदा वाढले आहेत.

सीएनजी गॅसचे दर वाढून गुरूग्राममध्ये 58.20 रूपये प्रतिकिलो, नोएडामध्ये 56.02 रूपये प्रतिकिलो तर मेरठ, मुझफ्फरनगर आणि शामलीमध्ये 63.28 रूपये प्रतिकिलो झाले आहेत.सीएनजीची रेवाडीमध्ये 58.90 रूपये किलो, कैथलमध्ये 57.10 रूपये किलो, फतेहपूर आणि हमीरपूर 66.54 रुपये किलो तर अजमेर, पाली आणि राजसमंदमध्ये 65.02 रूपये प्रतिकिलो किंमत असणार आहे.

Team Global News Marathi: