26 जानेवारी पूर्वी दहशतवादी हल्ल्याचा मोठा कट उधळला, ISI साठी काम करणाऱ्या दोघांना अटक

 

26 जानेवारी पूर्वी दिल्ली पोलिसांनी दहशतवादी हल्ल्याचा मोठा कट उधळून लावला आहे. दिल्ली पोलिसांनी जहांगीरपुरी येथून दोन दहशतवाद्यांना अटक केली होती. हे दोघे ISI साठी काम करत असल्याचं चौकशीमध्ये समोर आले आहे. त्यामुळे दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने प्रजासत्ताक दिनापूर्वी दहशतवादी हल्ल्याचा मोठा कट उघडकीस आणला आहे. जहांगीरपुरी येथून अटक करण्यात आलेल्या संशयितांची चौकशी करण्यात आली.

दिल्ली पोलिसांनी हरकत उल अन्सार आणि खलिस्तान टायगर फोर्स यांचे संबंध असल्याचा खुलासा केला आहे. हे दोन्ही दहशतवादी गट पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI च्या आश्रयाखाली तयार करण्यात आली आहे, ज्याचा उद्देश भारतात दहशत पसरवणे आहे, असेही दिल्ली पोलिसांच्य स्पेशल सेलने सांगितलं आहे. जहांगीरपुरी येथून अटक करण्यात आलेल्या संशयितांकडून हातबॉम्ब जप्त करण्यात आला आहे.

दिल्ली पोलिसांनी भालस्व डेअरीवर छापेमारी केली आणि दोन संशयित दहशतवाद्यांना अटक केली. दोघांनी दिलेल्या माहितीवरून भालसवा नाल्यातून एक मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. नाल्यामध्ये एका मृतदेहाचे तीन अवशेष आढळून आले आहेत. या दोन्ही संशयितांनीच ही हत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. दिल्ली पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी जगजीत उर्फ ​​जग्गा आणि नौशाद नावाच्या दोन संशयितांना अटक केली होती. नौशाद पाकिस्तानातील हरकत-उल-अन्सार या दहशतवादी संघटनेशी संबंधित आहे. त्याचा हस्तक पाकिस्तानात असल्याची माहिती आहे. जगजीतचा परदेशात असलेला खलिस्तानी दहशतवादी अर्शदीप डल्लाशी संबंध आहे.

Team Global News Marathi: