एनसीबीवर आरोप केल्यावर उत्तर द्यायला भाजपचे लोक पुढे येतात

 

मुंबई | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी ईडीची अजित पवार तसंच अनिल देशमुख आणि इतर नेत्यांवरील कारवाई, एनसीबीची कारवाई, देवेंद्र फडणवीसांची गेल्या काही दिवसांतील वक्तव्यं यांवर भाष्य केलं. केंद्र सरकार तपास यंत्रणांचा सतत राजकीय वापर करतय असं दिसतय. अनिल देशमुखांवर एका पोलीस कमिशनरने आरोप केले  त्यामुळे अनिल देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला.

पुढे ते म्हणाले की,  या आरोपांवरून विविध आरोपांची मालिका सुरू झाली. हे आरोप करणारे गृहस्थ गायब आहेत. काल अनिल देशमुखांवर पाचव्यांदा छापा टाकला. या यंत्रणांचं कौतुक केलं पाहीजे. एकाच घरावर ५ वेळा छापा घातला मात्र कारवाईत काहीही मिळले नाहीये. तसेच यावेळी त्यांनी एनसीबीवर सुद्धा निशाणा साधला होता.

मुंबई पोलिसांनी आता पर्यंत केंद्राच्या एजन्सीपेक्षा जास्त ड्रग्ज पकडली असून केंद्रीय यंत्रणांपेक्षा मुंबई पोलीस जास्त कार्यक्षम आहे. मुंबई पोलिसांच्या कामगिरीविषयी कोणाला शंका नसते, NCBने पंच म्हणून निवडलेले गोसावी अनेक दिवसांपासून फरार आहेत. सीबीआय, ईडी, एनसीबीचा गैरवापर होत असून केंद्रीय यंत्रणांच्या कारवाईसाठी सत्तेचा गैरवापर केला जात आहे तसेच NCB वर आरोप केल्यावर उत्तर द्यायला भाजपचे लोक पुढे येतात अशी टीका सुद्धा त्यांनी केली होती.

Team Global News Marathi: