युवा नेता पार्थ पवार लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत ? सुप्रिया सुळे आणि शरद पवारांची घेतली भेट

युवा नेता पार्थ पवार लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत ? सुप्रिया सुळे आणि शरद पवारांची घेतली भेट

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. तसेच पार्थ पवार राष्ट्रवादी पक्षाला सोडचिट्टी देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा होताना दिसत आहे. जर असे घडले तर पवारांच्या घरात मोठे राजकीय वादंग निर्माण होण्याचे चिन्ह दिसून येणार आहे.

या संदर्भात नुकतीच खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीत पार्थ पवार यांच्याबद्दल अनेक चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे पार्थ वेगळा मार्ग निवडणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळातबोलली जात आहे.

सुप्रिया सुळेंची मध्यस्थी

पवार कुटुंबात वाद सुरु असल्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर तोडगा काढण्यासाठी सुप्रिया सुळे यांनी पार्थ पवार यांना सिल्वर ओकवर बोलावलं. पार्थ पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात चर्चा झाली. पार्थ यांच्या भूमिकेमुळे पवार कुटुंबात जो कलह निर्माण झाला होता, त्यावर सुप्रिया सुळेंच्या मध्यस्थीमुळे तोडगा निघण्याची शक्यता आहे

पार्थ पवार कोणताही निर्णय आपल्या वडिलांना विचारल्याशिवाय घेऊ शकत नाही. दुसरीकडे राणे कुटुंबाने पार्थ पवार यांची पाठराखण केली आहे. त्यामुळे भाजपकडून ऑपरेशन लोटस हे महाराष्ट्रात सक्रीय झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: