ठाकरे कुटुंबाच्या मदतीला धावले बाळा नांदगावकर, म्हणाले…

ठाकरे कुटुंबातील कुणी असं करणार नाही – बाळा नांदगावकर

ठाकरे कुटुंबातील असं कोणी करणार नाही असे वक्तव्य मनसे नेते बाळा नंगावकर यांनी केले आहे. तसेच भारतीय जनता पक्षामुळेच हा वाद निर्माण झालेला आहे असे सुद्धा नांदगावकर यांनी बोलून दाखविले होते.

सिनेअभिनेता सुशांत सिह राजपूत आत्महत्या प्रकरणी मागील काही दिवसापासून पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे विनाकारण नाव गुंतवण्याचा प्रयत्न भाजपा पक्षाने केला आहे याच पाश्वभूमीवर आता मनसे पक्षाने आपली भूमिका मांडलेली आहे.

ठाकरे घराण्यातील व्यक्तीचा अशा प्रकारच्या एखाद्या घटनेत सहभाग असेल असं मला वाटत नाही. भाजपाच्या आरोपामुळेच हा वाद सुरू झाला आहे. सुशांतप्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी सर्वांनीच केली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

सर्वोच्च न्यायालयातही हे प्रकरण गेलं आहे. त्यामुळे चौकशी होत असल्याने त्यातून सत्य लवकरच बाहेर येईल, असे बाळ नांदगावकर यांनी सांगितले आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: