अमित राज ठाकरेंचे निवडणुकीच्या राजकारणात उतरण्याचे संकेत

समाजासाठीच राजकारणात जाण्याचा विचार करेल – अमित ठाकरे

सध्या राज्यातील सत्ता जरी ठाकरे सरकारच्या हातात असली तरी त्यांना न्याय हा कृष्णकुंजवर मिळताना दिसत आहे. एकीकडे राज्यात आघाडीचे सरकार अर्थात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले असले तरी आज अनेक समस्यांचे प्रश्न घेऊन नागरिकांचा ओढा राज ठाकरे यांच्या कृष्णकुंजवर येताना दिसत आहे.

यावर आता एकीकडे काका मुख्यमंत्री पदावर विराजमान असताना आणि भाऊ कॅबिनेट मध्ये मंत्री पदावर विराजमान असल्यामुळे राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे सुद्धा राजकरणात उतरतील का? असा प्रश्न विचारला जात आहे. मात्र आता याबाबत खुद्द अमित ठाकरे याची सूचक विधान केले आहे.

निवडणुकीच्या राजकारणाचा मी अजून विचार केलेला नाही. समाजकारण यालाच मी राजकारण मानतो. पण राजकारणात येऊन विधिमंडळ आणि संसदेत गेल्यास लोकांचे प्रश्न अधिक तीव्रतेने सोडवता येतात, प्रश्नांकडे लक्ष वेधता येते हे जे तुम्ही सांगत आहात त्याचा मी विचार करेन. यापैकी एका सभागृहात जायचे ठरवले तर ते मी तुमच्यामुळे जाईन, असे सूचक विधान अमित ठाकरे म्हणाले आहेत.

शेतकऱ्यांनो तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्हाला पूर्ण नुकसानभरपाई दिली जाईल-उद्धव ठाकरे

पुढे बोलताना ते म्हणाले की, कोरोना काळात डॉक्टर्स-नर्सेस-विद्यार्थी-आशा वर्कस यांचे प्रश्न सोडवणे ही काळाची गरज होती. हे घटक पहिल्या फळीवर इतकं काम करीत होते, त्यांचे प्रश्न सोडवणे मला गरजेचे वाटले. मी अलीकडच्या काळात मीडियासमोर आलो नाही, पण माझं काम थांबलं नव्हतं. प्रश्न ‘कृष्णकुंज’वर सुटतो हे आताचे नाही, राजसाहेब आधीपासूनच लोकांचे प्रश्न समजून घेतात आणि ते सोडवण्याची भूमिका घेतात, असंही अमित ठाकरे म्हणाले आहेत.

ग्लोबल न्युज नेटवर्क: