संजय राऊत मराठा समाजाची माफी , अन्यथा रस्त्यावर फिरू देणार नाही

संजय राऊत मराठा समाजाची माफी , अन्यथा रस्त्यावर फिरू देणार नाही

शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी सामना या अग्रलेखातून छत्रपती खासदार उदयनराजे भोसले तसेच छत्रपती खासदार संभाजी राजे यांच्यावर टीका केली या टीकेनंतर मराठा समाजामध्ये राऊत यांच्या विरोधात संतापाचे वातावरण पसरले आहे. यावर आता मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक पंकज जऱ्हाड आक्रमक झालेले आहे.

संजय राऊत तुम्हाला एकच इशारा आहे, दरवेळी तुम्ही ‘सामनाच्या अग्रलेखातून आमच्या समाजाला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांना टार्गेट करता, आम्ही हे खपवून घेणार नाही, असं मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक पंकज जऱ्हाड यांनी म्हटलं आहे.

ताबडतोब माफी मागा. जर माफी न मागता तुम्ही मराठवाड्यात आलात तर मराठा समाज तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा पंकज जऱ्हाड यांनी दिला आहे. दरम्यान, जिभेची तलवारबाजी लोकं फार काळ सहन करण्यासारखी स्थिती नाही, असा टोला संजय राऊतांनी सामनाच्या अग्रलेखातून खासदार छत्रपती संभाजी राजेंना लगावला होता.

सरकारने आता मराठा समाजाची परिक्षा पाहू नये, छत्रपती उदयनराजे भोसले यांचा सरकारला इशारा

ग्लोबल न्युज नेटवर्क: