मनसे सोबत युती करणार का? देवेंद्र फडणवीस म्हणतात की,

 

नागपूर | आगामी मनपा निवडणुकीत शिवसेना पक्षाने काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर आघाडी करून लढणार असल्याचे आधीच जाहीर केले होते. त्यामुळे एकाकी पडलेला भारतीय जनता पक्ष मनसे सोंबत युती करून मनपा निवडणुकीला सामोरे जाईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत होती. यावर आता विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भाष्य केले आहे.

फडणवीस दिल्लीहून नागपूरला दाखल होताच माध्यमांनी विमानतळावर त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेने बद्दलच्या युतीबद्दल प्रश्न विचारला. त्याला फडणवीसांनी अतिशय मोजक्या शब्दांत उत्तर दिलं. त्यामुळे भाजप आणि मनसेच्या युतीची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे.

नागपूरला परतलेल्या फडणवीसांना मनसेसोबतच्या युतीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यात येईल, असं उत्तर फडणवीस यांनी दिलं. मुंबई महापालिका निवडणुकीला अद्याप वेळ आहे. त्यामुळे योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल, असं सूचक विधान फडणवीस यांनी केलं. चंद्रकांत दादांचं विधान तुम्ही पूर्ण समजून घेत नाही. अर्धवट समजून घेता, असंदेखील फडणवीस पुढे म्हणाले.

Team Global News Marathi: