शेतकऱ्याला अधिकाऱ्याने मारली लाथ वाचा कुठे घडली घटना |

 

नवी दिल्ली | राजस्थान जालोर जिल्ह्यातील सांचौर भागात एका शेतकऱ्यासोबत अधिकाऱ्याने केलेल्या धक्कदायक प्रकारामुळे सर्वत्र संतापाची लाट पसरली आहे. अधिकाऱ्याने प्रश्न विचारणाऱ्या शेतकऱ्याला लाथ मारली आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वायरल होताना दिसत आहे.

प्रतापपुरा गावात भारत माला प्रकल्पाअंतर्गत तयार होणाऱ्या हायवेअंतर्गत मोबदल्यासाठी शेतकऱ्य़ांनी तेथील बांधकाम काम थांबवलं होतं. यावेळी सांचोर एसडीएमने शेतकऱ्यांना लाथ मारली. एसडीएम भूपेंद्र यादव हे नरसिंगराम चौधरी या शेतकऱ्याला लाथ मारली आहे. याचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाला असून लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

संतप्त झालेले शेतकरी आणि पोलीस यांच्यातही या घटनेनंतर झटापट झालेली पाहायला मिळाली. खूप प्रयत्नांनंतर पोलिसांनी संतप्त झालेल्या गावकऱ्यांना शांत केलं आहे. शेतकरी हे भारत माला प्रोजेक्ट अंतर्गत मोबादल्याची मागणी करत होते. अमृतनगर येथून जामनगरच्या दिशेने जाणाऱ्या एक्स्प्रेस वेचं काम हे गुरुवारी सुरू झालं आहे. याच दरम्यान काही गावकरी तेथे जमले आणि त्यांनी हे काम थांबवलं. त्यानंतर हा प्रकार घडला आहे. एसडीएमने गावकऱ्यांवरच मारहाणीचा आरोप केला आहे.

 

Team Global News Marathi: