महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना महाविकास आघाडी सरकारकडून राजाश्रय, चित्र वाघ यांनी साधला निशाणा !

 

मुंबईत निर्भया घटनेची पुनरावृत्ती करणारी संतापजनक घटना घडली आहे. ३० वर्षीय महिलेवर बलात्कार करुन आरोपींनी गुप्तांगात रॉड घुसवल्याचा अमानवीय आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. या घटनेत तरुणी गंभीर जखमी झाली असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तत्पूर्वी सदर महिलेचा मृत्यू झाल्याचेही बातमी समीर येत आहे. याच मुद्द्यावरून आता भाजपच्या महिला नेत्या चित्रा वाघ यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

साकीनाका बलात्कार प्रकरणातील महिलेचा मृत्यू झाल्यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी महाविकासआघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. हे सरकार पहिल्या दिवसापासून महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना राजाश्रय देत आहे. अशा लोकांवर गुन्हे दाखल होत नाहीत. गुन्हे दाखल झाले तरी महिलांवर अत्याचार करणारे लोक राजरोसपणे बाहेर फिरत आहेत. त्यामुळे विकृतांचे मनोबल वाढत आहे. राज्यात कायदा-सुव्यवस्थेचे इतके धिंडवडे कधीही निघाले नव्हते, अशी टीका चित्रा वाघ यांनी केली.

मुंबईतील साकीनाका परिसरात झालेल्या बलात्कार पीडित महिलेचा शनिवारी राजावाडी रुग्णालायत उपचारादरम्यान मृत्यू झाला. यानंतर चित्रा वाघ यांनी पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतली. या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना चित्रा वाघ यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली.

Team Global News Marathi: