बाळराजे पाटील अनगरकर बार्शीच्या राजकारणात एंट्री करणार का? चर्चाना उधाण; वाचा सविस्तर-

सोलापूर : “बाळराजे पाटील-अनगरकरांचा बार्शी शहर व तालुक्यातील संपर्क जुनाच आहे. मात्र त्यामध्ये वाढ होऊ लागली आहे. माजी मंत्री दिलीप सोपल यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडल्यानंतर बार्शीत राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली आहे. ती भरून काढण्यासाठी बार्शीतील युवक जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाळराजे उर्फ विक्रांत पाटील यांनी बार्शीच्या राजकारणात एन्ट्री करावी अशी मागणी करत होते व आहेत. या पार्श्वभूमीवर बाळराजे यांचे बंधू अजिंक्यराणा पाटील यांनी भाऊ बाळराजे यांनी बार्शी विधानसभा निवडणूक लढवावी अशी सोशल मीडियावर मागणी केली आहे. त्यामुळे बार्शी सह जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

या सर्व प्रकारानंतर माजी आमदार राजन पाटील यांनी सावध भूमिका घेत, अनगरकर पाटील कुटुंबीयांपैकी कोणीही बार्शीतून विधानसभेची निवडणूक लढणार नसल्याचे फेसबुक द्वारे स्पष्ट केले. त्यामुळे या चर्चांना पूर्णविराम मिळतोय असे वाटत असताना अचानकपणे विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा बाळराजे पाटील यांचे लहान बंधू अजिंक्यराणा पाटील यांनी बाळराजे पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर बार्शी मधून निवडणूक लढवावी, एक कार्यकर्ता म्हणून माझी तशी इच्छा असल्याचे स्वतःच्या फेसबुक द्वारे जाहीर केले. पिता-पुत्रांच्या या पोस्टमुळे बाळराजे काय निर्णय घेणार हे येणाऱ्या काळातच ठरणार हे मात्र नक्की.

यावर अजिंक्यराणा पाटील यांनी दुसरी पोस्ट शेअर करत मी जे मत व्यक्त केले होते.ते फक्त प्रेमापोटी केले आहे.तालुक्यातील आमची सामाजिक आणि राजकीय वाटचाल ही राजन मालक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.भविष्यात मालक जो काही निर्णय घेतील तो आम्हाला मान्य अशा आशयाची पोस्ट रात्री उशिरा सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. त्यामुळे बाळराजे बार्शीतून लढणार का याबाबत मोठा सस्पेन्स निर्माण झाला आहे.

माजी आमदार राजन पाटील हे जिल्ह्यातील मुरब्बी व मातब्बर राजकारण पैकी एक आहेत. कोणतीही राजकीय भूमिका घेण्याअगोदर ते सावध पावले टाकतात. बाळराजे पाटील बार्शीतून विधानसभेची निवडणूक लढवणार म्हटल्यामुळे, बार्शी तालुक्यातील लोकनेते बाबुराव अण्णा यांच्या विचारांना आणि अनगरकर पाटील कुटुंबीयांवर प्रेम असणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये जोश संचारला होता.त्यांचा मोहोळ वैराग चे आमदार म्हणून वैराग भागातील 57 गावात दांडगा जनसंपर्क आहे. तसेच उत्तर बार्शी भागातील सर्व नेते मंडळी यांच्याशी ही सलोख्याचे संबंध आहेत. तालुक्यात नातेवाईकांची संख्या ही जास्त आहे. मात्र बार्शीचे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि एकेकाळचे राजन पाटील यांचे राष्ट्रवादीचे पक्षातील सहकारी सहकारी दीलीपराव सोपल यांना राजन पाटील आपले गुरुबंधू मानतात.

बाळराजे यांच्या बार्शी एन्ट्री मुळे सहाजिकच ते दुखावले जातील असा विचार माजी आमदार राजन पाटील यांच्या मनात आला असेल. त्यामुळेच त्यांनी “सोशल मीडियाच्या माध्यमातून बार्शीचे भावी आमदार बाळराजे पाटील अशा आशयाच्या पोस्ट व्हायरल होताना बघायला मिळत आहेत. मात्र पाटील कुटूंबाच्या मनात तसा कोणताही विषय नाही.बार्शी तालुक्यातील ५२ गावांनी नेहमीच मला आणि पाटील कुटूंबाला प्रेम आणि पाठबळ दिल आहे. त्याबद्दल त्यांचा कायमच ऋणी असेल, त्यांच्या सुखदुःखात पाटील परिवार कायम सोबत असेल, आमच्या मनात बार्शी मधून लढण्यासंबंधी कसला ही निर्णय झालेला नाही. त्यामुळे लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होऊ नये, असे मी इच्छितो” अशा आशयाची माहिती फेसबुक वर पोस्ट करून या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.

मात्र दुसऱ्याच दिवशी कमी वयामध्ये कणखर नेतृत्व बनलेले, छोटे युवराज विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य अजिंक्यराणा पाटील यांनी “बार्शी आणि पाटील कुटुंबाचे गेल्या ३५ वर्षाचे ऋणानुबंध आहेत. मोहोळच्या जनतेप्रमाणेच बार्शीतील जनतेचे प्रेम आणि आपुलकी नेहमीच पाटील परिवाराच्या पाठीशी राहिली आहे. लोकनेते साखर कारखान्याच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून बार्शी तालुक्यातील सर्वसामान्य शेतकरी वर्गासोबत आपले जवळचे संबंध जोडले आहेत.या तालुक्यातील कित्येक गावचा ऊस हा गेल्या अनेक वर्षांपासून लोकनेते शुगर ला जात आहे. तसेच तालुक्यातील युवकांमध्ये बाळराजे पाटील यांची मोठी क्रेज ही आहे.

युवावर्ग यांच्या प्रश्नांची त्यांना योग्य जाण आहे. हे तालुक्यासह जिल्ह्यातील सर्वांना माहिती आहे, त्यामुळेच जनतेतून आणि विशेषतः तरुणांच्या मधून होत असलेल्या मागणीच्या आग्रहाखातर बाळराजे पाटील यांनी बार्शी मधून भविष्यात विधानसभा लढवायचा विचार करावा, ते योग्यवेळी अचूक निर्णय घेतीलच मात्र बाळराजे पाटील यांनी बार्शी विधानसभा मधून लेढावी, अशी माझी एक कार्यकर्ता म्हणून इच्छा आहे.” अशा आशयाची फेसबुक पोस्ट करून राजकीय धमाका उडवून दिला. त्यामुळे काही काळ दोन्ही तालुक्यातल्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली होती. शेवटी भविष्यातील राजकारणाचा विचार करून बार्शी आणि मोहोळ तालुक्यातील कार्यकर्त्यांना धाकटे युवराज यांचे म्हणणे पटले. त्यामुळे सर्वच कार्यकर्त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून बार्शी चे भावी आमदार बाळराजे पाटील असा ट्रेड चालवत सोशल मीडियामध्ये चांगलाच धुमाकूळ घातला.

या सर्व गोष्टींमुळे अनगरकर पाटील कुटुंबीयांवर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या जिल्ह्यात सर्वत्र असल्याचे स्पष्ट झाले आहे. बाळराजे पाटील यांच्या बार्शीच्या राजकीय एंट्री बाबत अनगरकर पिता-पुत्रांनी परस्परविरोधी फेसबुक पोस्ट केल्याने बाळराजे पाटील काय भूमिका घेणार याकडे कार्यकर्त्यांसह राजकीय जाणकारांचे लक्ष लागले आहे. असे असले तरी बाळराजे यांचा वाढलेला बार्शी संपर्क पाहता येणाऱ्या काळात बार्शीच्या राजकीय वर्तुळात दमदार एंट्री करून भल्या भल्यांची दमछाक करू शकतात असे राजकीय जाणकारांचे बोलले जात आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: