शुभ वार्ता: कोरोनाची पहिली लस टोचली पुण्यात, दुसरा डोस २८ दिवसांनी

पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटची देशातील पहिली मानवी चाचणी

कोरोनाची पहिली लस टोचली पुण्यात, दुसरा डोस २८ दिवसांनी

पुणे : पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटने कोरोनावरील ‘कोविशील्ड‘ ही लस धनकवडी येथील भारती विद्यापीठ रुग्णालयात दोन स्वयंसेवकाला दिली. यासाठी पाच स्वयंसेवकांची निवड करण्यात आली होती. त्यापैकी तीन जणांच्या अँटीबॉडी टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने इतर दोघांना ही लस टोचण्यात आली. हा डोस अर्धा मिलीचा होता.

परदेशात पहिली ट्रायल झाल्यानंतर भारतात कोविशील्ड चाचणीचा हा दुसरा टप्पा सुरु झाला आहे. भारतातील दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील लसीची ही चाचणी होत आहे. भारतात प्रथमच हि लस पुण्यातील दोघांना देण्यात आली आहे. पुढील २८ दिवसांनी या स्वंसेवकांना दुसरा डोस देण्यात येणार आहे. पुढील सात दिवसांत २५ जणांना ही लस देण्यात येणार आहे.

भारती विद्यापीठ रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. संजय ललवाणी यांनी याबाबत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. डॉ. ललवाणी म्हणाले कि, पुण्यात एकूण १०० स्वयंसेवकांना आज लस देत आहोत. त्यानंतर त्यांना काही साईड इफेक्ट होतोय का हे पाहण्यासाठी त्यांना अर्धा तास निरीक्षणाखाली ठेवून घरी सोडण्यात आले आहे.

या आठवड्यात २५ जणांना लस दिल्यावर त्यांना २८ दिवसांनी परत बोलावणार आहे आणि दुसरा डोस देणार आहे. त्यानंतर ६ महिन्यांनी त्यांची अँटीबॉडी टेस्ट करणार आहोत आणि त्यानंतर लसीला अंतिम मंजुरी मिळून त्यावर शिक्कामोर्तब होईल.

सिरम इन्स्टिट्यूट तर्फे या लसीच्या उत्पादनासाठी अष्टराझेनेका या ब्रिटिश-स्वीडिश कंपनीशी करार केला असून ऑक्सफर्ड विद्यापीठातर्फे लस विकसित करण्यात येणार आहे. भारतातील विविध १७ शहरांमध्ये या लसीच्या चाचण्या घेण्यात येणार आहे.

भारतामध्ये जवळपास कोरोनावरील सात लसींची चाचणी सुरु झाली आहे. यामध्ये जगभरात लसींची बादशाह असलेली सीरम इन्स्टिट्यूट ब्रिटेनचे ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि अॅस्ट्राझिनेका कंपनीच्या लसीमुळे आघाडीवर आहे.

आज 25 ऑगस्टला देशात कोरोना व्हायरसवरील लसीच्या दुसऱ्या चाचणी टप्प्याला सुरुवात झाली आहे. हे व्हॅक्सिन ब्रिटेनच्या ऑक्सफर्ड विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी विकसित केले आहे. मात्र, या लसीचे उत्पादन पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये केले जात आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: